मुंबई – सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘दीपिका पादुकोण’ने आतापर्यंत अनेक एकापेक्षा एक हीट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दीपिका अभिनेता रणवीर सिंगसोबत मुंबईत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
दरम्यान, मेरिकेतल्या टेक्ससमध्ये दीपिकाचे नाव एका डोशाला देण्यात आले आहे. वर्षाच्या सुरुवातील सोशल मीडियावर दीपिकाने या हॉटेलचे मेन्यूकार्ड शेअर केले होते. तुम्हाला दीपिकाच्या नावाचा डोसा खायचा असेल तर तब्बल 10 डॉलर मोजावे लागलीत.
तसेच, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर दीपिका आपल्या आगामी ‘द इंटर्न’ या चित्रपटाची तयारी सुरु करणार आहे. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या ‘इंटर्न’ चित्रपटाचा इंडियन रिमेक असणार आहे. दीपिकाने यापूर्वीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या बद्दल माहिती दिली होती.