कर्ज मर्यादा वाढवण्यास बायडेन-मॅक्कार्थी सहमत
तत्त्वतः सहमती असली तरी संसदेची मंजुरी अद्याप बाकी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि संसदेचे सभापती केविन मॅक्कार्थी यांच्यात आर्थिक कोंडी सोडवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेची कर्ज मर्यादा वाढवण्याला दोन्ही नेत्यांनी तत्वतः सहमती दर्शवली आहे. यामुळे अमेरिकेवर आर्थिक आणिबाणी ओढवण्याचे संकट टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बायडेन आणि मॅक्कार्थी यांच्यात झालेल्या सहमतीनुसार 2025 पर्यंतच्या बिलांची देयके देण्यासाठी कर्जाची मर्यादा 31 हजार 400 अब्ज डॉलर पर्यंत वाढवली जाणार आहे. देशांतर्गत खर्च कमी केले जाणार आहेत आणि देशातील राष्ट्रीय सरकारकडून आर्थिक लाभ घेणाऱ्या नोकरदारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जाणार आहेत, अशी माहिती या चर्चेशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. हा विषय आर्थिक संवेदनशील असल्यामुळे या चर्चेचा अधिक तपशील उघड केला जाऊ शकलेला नाही.
रिपब्लिकन पक्षाने जानेवारी महिन्यात संसदेत मिळवल्यानंतर कर्ज मर्यादेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने आखलेल्या रणनितीच्या अनुषंगाने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यांची पूर्तता या तडजोडीतून बघायला मिळते आहे. ताठर भूमिकेमुले देशात मंदी येऊ शकेल, या इशाऱ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या तडजोडीतील तपशील मॅक्कार्थी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आज संध्याकाळी सांगणार आहेत.
बायडेन आणि मॅक्कार्थी यांनी तडजोडीचा तपशील जाहीर करण्यापूर्वीच रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही सदस्यांनी या तडजोडीवर टीका करायला सुरुवात केली. त्यामुळे आपापल्या पक्षातील सहकाऱ्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी दोन्ही नेत्यांवर येऊन पडली आहे.
अमेरिकेती पुराणमतवादी नेत्यांनी मॅक्कार्थींना दोष देत बंडखोरी करण्याचा पवित्राही घेतला. काटकरीचे जेवढे प्रमाण असणायाचा ठराव संसदेने गेल्या आठवड्यात केला होता, तेवढे राखण्यास मॅक्कार्थी अपयशी ठरल्याचा आरोप या नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. त्यामुले रिपब्लिकन आणि डोमोक्रॅटिक पक्षांमधील संघर्षाची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.