नवी दिल्ली – पोलीस स्थानकावर थेट रॉकेटने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.पंजाबमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तरनतारन या ठिकाणच्या पोलीस स्टेशनवर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हल्ला रात्रीच्या सुमार झाल्याने पोलीस ठाण्यात जास्त कर्मचारी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अमृतसर-बठिंडा हायवेवर असलेल्या सरहाली पोलीस स्थानकावर झालेला हा हल्ला शनिवारी सकाळी उघडकीस आला. रॉकेट पोलीस ठाण्याच्या बाहेरील एका भागातून आतमध्ये फेकण्यात आले. मध्यरात्री एकच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान आहे.
Punjab | A blast occurred outside the Intelligence Department building of Punjab Police in Mohali. The police have cordoned off the area around the office. pic.twitter.com/5sOPC7yJrP
— ANI (@ANI) May 9, 2022
या हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. खलिस्थानी समर्थकांसचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे. आसपासच्या इतर पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.