जळगाव – एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुभाजकाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस (private bus) नाल्यात कोसळून दोन ठार, तर 12 प्रवासी जखमी झाले. मृतांत चालकासह सहचालकाचा समावेश आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. (Jalgaon news)
एरंडोल तालक्यातील पिंपळकोठा गावानजीक असलेल्या नाल्यात चौधरी यात्रा कंपनीची निमकथाना (राजस्थान) या जिल्ह्यातून येणारी आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी खासगी बस कोसळली. त्यात चालकासह सहचालकाचा मृत्यू, तर 12 प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले.
एरंडोल येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत मृतांसह जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयासह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यास मदत केली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी तातडीने सुरळीत केली.