नवी दिल्ली – पाकिस्तानमधील महागाईने सर्वसामान्य नागरिकांना आज आणखीन एक दणका दिला असून देशातील पेट्रोल आणि डिझेल्च्या किंमती पुन्हा भडकल्या आहेत. आता पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल 330 रुयांवर पोचले आहे.
या दरवाढीमुळे पाक नागरिकांनी त्वरित आंदोलन सुरू केले आहे. पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन सुरूच असून आता एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया तब्बल 296.41 इतक्या नीचांकी पातळीवर पोचला आहे.
पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये 26 रुपयांनी आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 17.34 रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी रात्री जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये करण्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या वाढीत ही वाढ 27.4 टक्क्यांनी जास्त आहे.
काळजीवाहू सरकारने 1 सप्टेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 14 रुपयांची वाढ केली होती. दिनांक 15 ऑगस्टपासून पेट्रोल 32.44 आणि डिझेल 38.49 रुपयांनी महागले आहे. या दरवाढीचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होणार हे उघड आहे.