थोडसं समाधान! देशात २४ तासांत ३ लाखांपेक्षा कमी बाधितांची नोंद; मात्र मृत्यूचे सावट गडदच…

नवी दिल्ली : देशात मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.  त्यामुळे देशात  मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता सर्व वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट  झाली आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांत थोडी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले  आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ३,७८,७४१ रुगांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४,१०६ रुगांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे दिली. तर दिल्ली आणि महाराष्ट्रातही रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आतापर्यंत देशात एकूण २,४९,६५,४६३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २,११,७४,०७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत कोरोनामुळे देशात २,७४,३९० रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात ३५,१६,९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली. सध्या देशात १८,२९,२६,४६० नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने  दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.