बीजिंग – चीनमधील एका पित्याची एक अनोखी कहानी समोर आली आहे त्याचा मुलगा वयाच्या दुसऱ्या वर्षी हरवला होता या मुलाचा शोध घेण्यासाठी त्याने तब्बल चोवीस वर्ष पाच लाख किलोमीटरचा प्रवास केला त्यानंतर त्याला आपल्या मुलाचा शोध लागला 26 वर्षाचा हा मुलगा सध्या प्राध्यापक म्हणून एका महाविद्यालयात काम करत आहे.
शेंगडेन प्रांतांमध्ये राहणाऱ्या गॉड रिंगटोन यांच्या मुलाचे अपहरण वयाच्या दुसऱ्या वर्षी काही मानवी तस्करांनी केले होते त्यानंतर सतत हा पिता आपल्या मुलाचा शोध घेत होता या काळात संपूर्ण चीनमध्ये त्याने तब्बल पाच लाख किलोमीटर प्रवास पूर्ण केला या विषयावर चीनमध्ये 2015 मध्ये एक चित्रपटही बनवण्यात आला होता.
ज्यामध्ये अँडी लाऊ या हँगकाँगच्या सुपरस्टारने काम केले होते चीन मध्ये लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक असून अतिशय लहान वयात मुलांचे अपहरण करण्याचा व्यवसाय चीनमध्ये तेजीत आहे विविध कारणासाठी त्या मुलांचे अपहरण केले जाते.
अशाप्रकारे 24 वर्षांपूर्वी या पित्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते घराबाहेर खेळणाऱ्या मुलाचे अपहरण करून त्याला हाईनान प्रांतामध्ये विकले होते त्याच्या पित्याने मोटर लसायकल चा वापर करून चीनमधील 20 राज्यांमध्ये जाऊन पाच लाख किलोमीटर प्रवास करून आपल्या मुलाचा शोध सुरू ठेवला होता.
हा प्रवास सुरू असताना अनेक वेळा त्याचे पैसे संपत असत तेव्हा तो पुलाखाली राहत असे आणि अनेक वेळा भिक मागून पैसे घेऊन परत एकदा शोध मोहीम सुरू ठेवत असे याच कालावधीमध्ये या पित्याने ज्यांची लहान मुले अशा प्रकारे बेपत्ता झाली आहेत अशा पालकांचे संघटना स्थापन करून त्यांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू ठेवली आणि अशाप्रकारे गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये त्याने सात मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत ही मुले पोहोचवण्याचे काम केले हे काम सुरू असतानाच त्याला अगदी अचानक पणे आपल्या मुलाचा ही शोध लागला हा मुलगा सध्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाचे काम करत आहे.