अरे बापरे! करोनानंतर आता मंकीपॉक्स; ‘या’ देशात रुग्ण आढळल्यानं खळबळ

लंडन  :  देशासह जगात करोना लाट जरी ओसरत असली तरी धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. कारण करोनातुन मुक्त होणाऱ्या रुग्णांना बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत  आहे. आतापर्यंत रुग्णांना काळी,पांढरी, आणि पिवळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.  यातच करोना लढाई सुरु असतांनाच ब्रिटन येथे आणखी एक नवा विषाणू सापडला आहे.

अमेरिकेत नुकताच दुर्मिळ मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला आहे. मंकीपॉक्स या रोगाचा टेक्सासमध्ये आढळलेला पहिला रुग्ण होय. या रुग्णाने नायजेरियावरुन अमेरिकेत प्रवास केला आहे. सध्या या रुग्णावर डलास येथे उपचार सुरु आहेत. अमेरिकेत या रोगाचा हा पहिलाच रुग्ण आढळला असल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं म्हटलं आहे.  काही महिन्यांपूर्वी, ब्रिटनमधील नॉर्थ वेल्समध्ये एकाच कुटुंबीतील दोन व्यक्तींना मंकीपॉक्स झाला होता.

अशी आहेत मंकीपॉक्स आजाराची लक्षणे

  • या आजारमध्ये रुग्णांचा शरीरावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरावर पुरळ येतात.  त्यानंतर ते  संपूर्ण शरीरावर पसरतात.

  • आजारादरम्यान, रॅशेस तांबड्या रंगाचे होतात. अखेर या चट्ट्यांचे पापुद्रे बनून शरीरावरून गळून पडतात.

–  रुग्णाला या आजारात ताप, डोकेदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.