पाबळमध्ये वाहिली भक्तीची भजनगंगा

पाबळ: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळयासाठी जिल्ह्याजिल्ह्यातून पायी वारी करीत वारकरी आलंदीत येत आहेत. त्यामध्ये पाबळ मार्गे येणाऱ्या अनेक दिंड्या आहेत.

या अनेक दिंड्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील एक दिंडी पाबळ येथे चहा पण्यासाठी क्षणभर विसावली, त्यावेळी माहिती घेतली असता, दिंडीप्रमुख महिलेने या दिंडीचे एक “वेगळेपण’ सांगून सर्वाना आश्चर्यचकित केले.

दरम्यान विसाव्यातही या दिंडीतुन,पुन्हा भजनाचे सूर निघाले,पेटी ताल देऊ लागली, मृदंग साथ देऊ लागला, वारकरी टाळ्यांच्या तालात डोलू लागले आणि महिलांनी फेर धरला, काही क्षणसाठी या विसाव्याच्या ठिकाणी भक्तीची भजन गंगा पाबळकरांना अनुभवायला मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.