आळंदी – ज्ञानोबा-तुकारामाचा अखंड जयघोष करीत खांद्यावरील भगव्या पताका उंचावत राज्यभरातून हजारो वैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या 724 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, मुख्य कार्तिकी एकादशी शनिवारी (दि. 23) आणि माउलींचा संजीवन समाधीदिन सोहळा सोमवारी (दि. 25) परंपरेने साजरा केला जाणार आहे.