कुरवली – येथील शेतकरी कुटुंबांना इफको किसान संचार लिमिटेड दिल्ली व राजेंद्र विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बंबाडवाडी (ता. इंदापूर) यांच्या वतीने शेतकऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. संचालक विलास माने यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, मसाले आदी वस्तूंचे मोफत वाटप सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महेश पोल, पैलवान नितीन माने, उपसरपंच सुरेश चव्हाण, पोलीस पाटील विलास कणसे, बापुराव पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष भालचंद्र चव्हाण, डॉ. तुकाराम गोरे, डॉ. गणेश पवळ, दिलीप पांढरे, गणेश पांढरे, विलास भालचंद्र माने, विठ्ठल माने, अनिल माने, समीर माने, अविनाश कदम, नरसिंग माने, संजय सपकळ, दत्तात्रय कदम, हनुमंत तनपुरे, सतीश माने, चांगदेव चव्हाण, सचिव सुनील माने, सुधीर तनपुरे, किरण घोरपडे, मयूर माने, ऋषिकेश माने, तात्या सावंत, पोपट खरात, सुहास सपकळ, बापुराव सावंत, शितल माने, विकास सावंत, सचिन गोरे, मंगेश गोरे, सुनील माने, सचिन माने, अजीत गायकवाड, दीपक खरात आदी यावेळी उपस्थित होते.