मंचर -पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घराच्या ओघाने निघालेल्या 1230 स्थलांतरीत कामगारांना लुपिन फाउंडेशनच्या वतीने पेठ-मंचर येथे मदतीचा हात देण्यात आला, अशी माहिती भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे यांनी दिली.
आत्तापर्यंत लुपिन फाउंडेशनच्या वतीने देशभरात 98 हजार 673 रेशन किट, 7 लाख 69 हजार 240 मास्क, 9 लाख 93 हजार 534 औषध साठा आणि मेडिकल साहित्य, 8 हजार 353 पीपीई किट आणि 1 लाख 80 हजार 340 सॅनिटायझर बॉटल्सचे वाटप करण्यात आल्या आहे.