फलटणमध्ये धान्य गोदामाला आग

फलटण – येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दरम्यान, आग लागल्याची घटना तात्काळ लक्षात आल्यामुळे अग्निशमन दलाला ही आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. तसेच वेळीच आग आटोक्‍यात आल्याने मोठ्या प्रमाणात धान्यसाठा वाचविण्यात आला आहे.

आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळी उपस्थित लोकांच्या आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचारी यांनी सांगितले. यावेळी गोदामाची चावी नसल्याने शटरचे कुलूप तोडून नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्‍यात आणली. या जुन्या शासकीय गोदामात 2322.50 क्विंटल गहू, 2449 क्विंटल तांदूळ, 70 क्विंटल साखर, 213.50 क्विंटल तूरडाळ, 130 क्विंटल चणाडाळ या धन्याचा लाखो रुपये किंमतीचा साठा ठेवण्यात आला होता.

या आगीत हमाल बिल रजिस्टर, 2 टेबल, 4 खुर्ची, 2 पंखे जळले असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामास शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामातील महावितरणच्या वीज मीटर मधून वीज कनेक्‍शन घेतले होते. कुलर, फॅन, ट्यूब यांचा लोड एकाच मिटरवर आल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याची शक्‍यता गोदामाची पहाणी केल्यानंतर महावितरणच्या अभियंता शरद येळे यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.