गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली विक्रमाची नोंद
न्यूयॉर्क: फ्रेंच फ्राईज हा फास्ट पुढचा राजा मानला जातो. साधारणपणे रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या फ्रेंच फ्राईजची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशीच असते, पण न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटने फ्रेंच फ्राईज ची जी डिश तयार केली आहे याची किंमत 200 डॉलर्स म्हणजेच तब्बल 15 हजार रुपये आहे.
क्रीम दा ला क्रीम नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये ही डिश उपलब्ध असून या डिशमध्ये खाण्यायोग्य सोन्याचा मुबलक वापर करण्यात आल्याने ही डिश एवढी महाग झाल्याचे सांगण्यात येते. या महागड्या डिशसाठी ज्या बटाट्यांचा वापर करण्यात आला आहे तेसुद्धा सर्वोच्च गुणवत्तेचे असल्याने महाग आहेत. त्याशिवाय इतर सर्वच घटक महाग आणि सर्वोच्च गुणवत्तायुक्त निवडण्यात आले आहेत.
या डिशवर सर्वात शेवटी सोन्याचे कण शिंपडले जातात त्यामुळे डिशची किंमत 200 डॉलर म्हणजे 15 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. 23 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे खाण्यायोग्य कण या डिशवर शिंपडण्यात येतात. 2021 मध्ये या रेस्टॉरंटमधील या फ्रेंच फ्राईज डिशचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. या रेस्टॉरंटमधील शेफ जो आणि शेफ फेड्रिक या दोघांनी ही महागडी डिश तयार केली आहे. या रेस्टॉरंटने यापूर्वीही अशा प्रकारचे विक्रम केले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक तब्बल 19 लाख रुपयांचे आईस्क्रीम तयार केले होते, त्याची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.