न्यूयॉर्क : पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. जगात आढळणाऱ्या सर्व प्राण्यांचे स्वतःचे असे एक खास वैशिष्ट्य आहे. यातील अनेक प्राणी अत्यंत विषारी असतात तर काही अतिशय निरुपद्रवी असतात. मानव विषारी प्राण्यांना घाबरतो आणि त्यांच्यापासून दूर राहतो. तुम्हाला आजवर किंग कोब्रा हा सापच जगातील सर्वात विषारी प्राणी वाटत होता का? तर ही माहिती त्रोटक असून जगात असाही एक प्राणी आहे ज्याचे विष काही सेकंदात एखाद्याचा जीव घेऊ शकते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा विषारी प्राणी साप किंवा विंचू नाही. चला जाणून घेऊया ज्या प्राण्याला शास्त्रज्ञ जगातील सर्वात धोकादायक प्राणी मानतात तो कोण आहे आणि तो सर्वात धोकादायक असण्याचे कारण काय आहे?
एका अहवालानुसार अनेक पॅरामीटर्सच्या आधारे प्राणी सर्वात धोकादायक मानले जातात. उदाहरणार्थ, ते किती विषारी आहेत, किंवा ते किती हिंस्त्र आहेत, किंवा ते किती रोग पसरवतात वगैरे. आज आम्ही तुम्हाला सर्वात विषारी प्राण्यांबद्दल सांगणार आहोत.
बहुतेक लोक किंग कोब्रा साप, क्रेट साप किंवा अनेक विंचू सर्वात विषारी मानतात. तर त्याच वेळी काही लोकांचा असा विश्वास आहे की बेडूक किंवा बॉक्स जेलीफिशची विशिष्ट प्रजाती सर्वात विषारी प्राणी आहे. पण एका अहवालात असे म्हटले आहे की जगातील सर्वात विषारी प्राणी म्हणजे जिओग्राफी कोन स्नेल (कॉनस जिओग्राफस) ही गोगलगाय आहे.
असे म्हणतात की मोठा विंचू आपल्या भक्ष्याला मारण्यासाठी जितके विष वापरतो त्याचा केवळ दहावा भाग वापरून हा कोन स्नेल आपल्या भक्ष्याला मारतो. जगात गोगलगायीच्या 600 हून अधिक प्रजाती आढळतात, त्यापैकी कोन स्नेल ही गोगलगाय सर्वात धोकादायक आहे. ही इतकी विषारी आहे की एखाद्याचे आयुष्य एका क्षणात संपवू शकते.
ही छोटी गोगलगाय इंडो-पॅसिफिकच्या खडकांवर आढळते. त्यांचा माणसांशी फार कमी सामना होतो. यामुळे, या प्राण्याच्या विषामुळे मानवाचा मृत्यू होणे अत्यंत दुर्मिळ आहे. कोन स्नेलमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही गोगलगाय चावलेल्या लोकांना वेळेवर रुग्णालयात नेले नसल्याने तब्बल 65 टक्के लोकांचा मृत्यू झाला. हिचे विष नाहीसे करण्यासाठी औषध नाही.