सातारा – येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील एक संशयिताचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ४२ झाली आहे.
दरम्यान, साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील २०, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ३३, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ६, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील १ व वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील १ अशा एकूण ६१ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात १४ जणांना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.