नेवासा – मिञाच्या लग्नाला जात असतांना नेवासा येथील तीन युवकांवर काळाने दुर्देवी घाला घातला असून चालकाचे कारवरील नियंञण सुटल्याने पेंडगांव (जिल्हा बीड) येथे कारने क्षणार्धात तीन – चार पलट्या घेत रस्त्याचा बाजूला जाऊन उलटली या भिषण अपघातात नेवासा येथील तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात बीड जवळील पेंडगांव येथे गुरुवारी (दि.२२) रोजी मध्यराञीच्या सुमारास घडला या दुर्देवी घटनेने नेवासा शहरावर शौककळा पसरली आहे
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नेवासा शहरातील चार युवक आपल्या कारमधून बीड येथे मिञाच्या लग्नाला जात असतांना बीडजवळील पेंडगांव शिवारात कार चालकाचे कारवरील अचानक नियंञण सुटल्याने अपघातग्रस्त कारने तीन – चार पलट्या घेत कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली हा अपघात इतका भिषण होता की,कारचा चक्काचुरा झालेला असून या कारमधील तीन जागीच ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या अपघातात कारमधील धीरज गुंदेचा (वय ३०),रोहन वाल्हेकर (वय ३२),विवेक कांगुणे (वय ३३) असे तीन जण या अपघातात जागीच ठार असून आनंद वाघ हा युवक या अपघाता गंभीर जखमी झाला आहे जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून नेवासा येथील तीन युवकांचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे शहरावर शौककळा पसरली आहे