इस्तंबूल – येथील विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप मध्ये व्हिस्कीच्या एका बाटलीला तब्बल चार कोटी रुपये किंमत मिळाली आहे अतिशय दुर्मिळ आणि किमती अशा या जपानी व्हिस्कीची खरेदी एका चिनी नागरिकाने केली आहे.
यामाजाकी या नावाने ओळखली जाणारी ही व्हिस्की तब्बल 55 वर्षापूर्वी तयार करण्यात आली असून अतिशय दुर्मिळ मानण्यात येते अतिशय कमी प्रमाणात या विस्कीची निर्मिती करण्यात येते इस्तंबुल विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमध्ये कमी किमतीसाठी ही विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
तरीही या एका बॉटलसाठी तब्बल चार कोटी रुपये देण्यात आले ही व्हिस्की अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे इच्छुक ग्राहकांना लिलावात बोली लावण्यासाठी पाचारण करण्यात आले होते अशा वेळी एका चिनी प्रवाशाने सर्वात जास्त बोली लावून चार कोटी रुपयांना या व्हिस्कीच्या बाटलीची खरेदी केली व्हिस्की बनवणारी कंपनी हाऊस ऑफ सूनटोरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या विस्कीला चंदनाचा सुवास येतो.
त्याशिवाय ज्या बाटलीमध्ये ही विस्की भरून ठेवण्यात आली आहे ती अतिशय आकर्षक आहे त्याशिवाय ही बाटली ज्या खोक्यात ठेवण्यात येते ते खोके दुर्मिळ अशा लाकडापासून तयार करण्यात आले आहे.
या विमानतळावर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा व्यवहार असून भविष्यातही अशा प्रकारचे लिलावाचे व्यवहार या विमानतळावर केले जातील अशी माहिती विमानतळाच्या व्यवस्थापकांनी दिली आहे आणखीन जर या प्रकारच्या विस्की उपलब्ध झाल्या तर त्या लिलावासाठी उपलब्ध केल्या जातील असेही सांगण्यात आले आहे