नवी दिल्ली – देशाच्या विविध भागात सध्या कोविड लसीकरणाचा जो पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लसीकरणाचे सरकारने जाहींर केलेले उद्दीष्ट आणि प्रत्यक्षात झालेले लसीकरण याची यादीच त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात जारी केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, जे उद्दीष्ठ होते त्यात प्रत्यक्ष लसीकरणात मात्र 27 टक्के घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लस कोठे आहे असा हॅश टॅगही त्यांनी चालवला आहे. सरकारने 21 जून पासून देशात सर्वत्र मोफत लसीकरण मोठ्याप्रमाणात सुरू केले जाईल असा दावा केला होता.
त्यानुसार 21 जुलै रोजी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेही पण त्यानंतर मात्र पुन्हा त्यात ढिलाई दिसून येत असून अनेक केंद्रे लसीअभावी पुन्हा बंद करावी लागली आहेत. त्याच अनुषंगाने राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सातत्याने आकडेवारी सादर करीत टीका सुरू केली आहे.