चंदीगड – करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट देशासाठी अत्यंत घातक ठरली आहे. बाधितांची संख्या वाढल्याने आरोग्यव्यवस्थेवर निर्माण झालेला ताण, ऑक्सिजन, रेमडीसीवीर यांचा तुटवडा यांमुळे मृतांचा आकडा देखील वाढला आहे. विषाणू संसर्गामुळे कुटुंबच्या-कुटुंब मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही आपल्या कानावर पडत असतात.
मात्र अशा नकारात्मक वातावरणात बाधितांचा करोनाविरोधातील यशस्वी लढा आपल्याला प्रेरणा देणारा ठरतो. हरियाणातील एका ९९ वर्षीय वयोवृद्धेचा असाच करोनाविरोधातील लढा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गुरुग्राम येथील एका ९९ वर्षीय वयोवृद्धेला करोना विषाणूची बाधा झाली होती. यानंतर त्यांना घरामध्येच अलगीकृत ठेवण्यात आले होते. त्यांना इतरही काही व्याधी असल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतीत होते. मात्र या आजीबाईंनी स्वतःला सकारात्मक ठेवत यशस्वीरीत्या करोनावर मात केली.
याबाबत बोलताना या आजीच्या नातूने सांगितले की, “आम्ही त्यांच्या सभोवताली प्राणवायू देणारी झाडं ठेवली. तसेच त्यांना फळे व पालेभाज्यांचा आहार दिला. आता त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. आजींच्या या करोनाविरोधातील लढ्यामध्ये आशा सेविकांनी देखील मोलाची मदत केली.”
दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बाधित रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे की घरीच अलगीकरणात ठेवावे याबाबतचा योग्य निर्णय वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास बाधित रुग्ण या संसर्गातून सुखरूप बाहेर पडू शकतो.
H+aryana | A 99-year-old woman with comorbidities from Gurugram defeats COVID-19 by staying in home quarantine
“We used natural air purifying plants to give her fresh air. We gave her fruits, vegetables. She recovered well. ASHA worker also supported us,” says her grandchild pic.twitter.com/L5Htpls9Og
— ANI (@ANI) June 3, 2021