पुणे : राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची चौथऱ्यासह 35 फूट उंच मूर्ती सिंहगड रोड येथील स्टुडिओत पुण्यातील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी साकारली आहे. सिव्हीइलेक प्रोजेक्ट सोल्युशन या कंपनीकडून ही मूर्ती तयार करण्यात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या दिवशी ती बसविण्यात येणार आहे.
मागील दोन महिन्यापासून मूर्ती शिल्पकार विनोद येलारपूरकर ही मूर्ती साकारात आहेत. याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार मदत करत आहे. यानुसार सदर सुबक मूर्ती बनविण्यात आली आहे. ही मूर्ती बनविण्याकरिता 40 किलो वजनाची 200 मातीची पोती लागली. तर, दीड हजार किलो वजनाचे लोखंडी सांगाडा व फायबर वापरण्यात आले. दहा फुटी चौथ्यावर मूर्ती स्थापित केल्यानंतर बाजूला पेटी, तबला, वीणा, डगा ही वारकऱ्यांची वाद्य ही लावण्यात येणार आहे.
मूर्तीच्या उजव्या हातात कमल पुष्प आणि डाव्या हातात शंख अशा स्वरुपात विष्णु रुपात ही मूर्ती साकारण्यात आली आहे. सिव्हिइलेक प्रोजेक्ट कंपनीचे संचालक दत्तात्रय आत्माराम भालेगरे व कमलेश आत्माराम भालेगरे यांनी ही मूर्ती तयार करण्याची कल्पना शिल्पकार येलारपूरकर यांच्याकडे मांडली होती.