पिंपरी – चिंचवड येथे हेंमत डांगे मित्र परिवाराच्या वतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रभु श्रीरामाची २५ फुटी प्रतिकृती साकारण्यात आली होती. महाआरती माजी गटनेते राहुल कलाटे व परिसरातील ११ जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली.
१०१ किलो लाडू प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी गजानन महिला भजनी मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, तालेरा नगरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे यांनी केले होते.
मनविसे शहर अध्यक्ष अनिकेत प्रभु, मनसे महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ, वैशाली बोत्रे, अनिल घोडेकर, सामाजिक कार्यकर्ते सहदेव डांगे, रमेश वाळुंज, तुकाराम चौधरी व परिसरातील नागरिक व मनसे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी तुषार वराडे, निखिल गावडे,नासिर शेख, शरणय पाटणे, प्रसाद दुधुसकर, प्रज्योत पुजारी, यश कुदळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष मनविसे हेमंत महादेव डांगे यांनी केले होते.