आंध्र प्रदेशात महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात ; ६ जणांचा होरपळून मृत्यू, ३२ जण गंभीर जखमी

Accident in Andhra Pradesh । आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर आज पहाटे एक भीषण रस्ता अपघात झालाय. ज्यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तेलंगणाची राजधानी बापटलाहून हैदराबादला जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसली. त्यात सहा जण जिवंत जाळले. या अपघातात ३२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दक्षिणेकडील राज्यात घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय. ज्यामध्ये बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहे. या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवानही आग विझवताना दिसत आहेत. बापटलाहून लोक मतदान करून परतत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
5 individuals burned alive, many injured as a private bus collides with a lorry and catches fire in #Chilakaluripet Mandal, #Palnadu district. The bus was carrying 40 passengers returning to #Hyderabad from #Bapatla district after casting their votes. #BusFire #BusAccident pic.twitter.com/rnycRD4jQt
— Glint Insights Media (@GlintInsights) May 15, 2024
अपघाताच्या वेळी बसमध्ये 42 प्रवासी Accident in Andhra Pradesh ।
बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून एक खाजगी बस हैदराबादला जात होती. त्यानंतर हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला धडकली. अपघातानंतर लगेचच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अपघाताच्या वेळी बसमध्ये ४२ जण प्रवास करत होते, असे जखमींनी सांगितले. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला.
मृतांमध्ये 8 वर्षांच्या मुलीचाही समावेश Accident in Andhra Pradesh ।
रस्ते अपघातात जीव गमावलेल्या लोकांचीही माहिती समोर आली आहे. ठार झालेले लोक बापटला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये 35 वर्षीय बस चालक अंजी, 65 वर्षीय उपपगुंडूर काशी, 55 वर्षीय उपपगुंडूर लक्ष्मी आणि मुप्पाराजू ख्याती सासरी नावाच्या 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे. उर्वरित दोन जणांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात 32 जण जखमी झाले आहेत. जखमींवर चिलकलुरीपेठ शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना चांगल्या उपचारासाठी गुंटूर येथे हलवण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे.





