मॉस्को: रशियातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय चॅनेल असलेल्या चॅनेल वन या वाहिनीने अंतराळात चित्रीकरण करण्याचा संकल्प केला असून त्यासाठी एका अभिनेत्रीचा शोध घेतला जात आहे.
रशियाची अवकाश संस्था रॉसकॉसमॉस यांच्या सहकार्याने चॅनेल वन हि वाहिनी हवं चित्रीकरण करणार आहे चॅलेंज असे या चित्रपटाचे तात्पुरते नाव असणार असून त्यासाठी रशियातील एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रीने काम करावे असे प्रयत्न करण्यात येत आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ऑक्टोबर २०२१ पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे या कामासाठी या वहिनीला २५ ते ४० वयोगटातील १५० ते १८० सेंटीमीटर उंच आणि ५० ते ७० किलो वजन असलेली अभिनेत्री हवी आहे
हॉलीवूडचा टॉपचा अभिनेता टॉम क्रूझने नुकतीच नासा आणि इलॉन मस्क यांच्या सहकार्याने अंतराळातील प्रकल्प साकारण्याचे सूतोवाच केले होते
त्यानंतर लगेच राशीच्या हि घोषणा केल्याने आता अंतराळात चित्रीकरण करण्याचीही स्पर्धा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत धावणे पोहणे आणि ऍरोबिकस या क्षेत्रातही ती कुशल असावी अशी या वाहिनीची अपेक्षा आहे