बंगळुरू – कर्नाटकमधील दोन विधानसभा जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यावेळी राज राजेश्वरी नगर येथील एका बुथवर कोरोना बाधीत रूग्णाने मतदान केले. कोरोना बाधीत रूग्ण मतदान करण्यासाठी पीपीई कीट घालून अॅंबूलन्स मधून आला होता. यावेळी बुथमधील सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घातले होते. तसेच कोरोना रूग्ण मतदान करून गेल्यानंतर बुथ सॅनिटाईझ करण्यात आले.
कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगर आणि सीरा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. सीरा चे आमदार सत्यनाराय यांचे निधन आणि राजराजेश्वरी नगरचे काॅंग्रेसचे आमदार मुनिरत्न यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणुका घेण्यात आल्या.
मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान झाले. त्याचवेळी बिहार सह अन्य दहा राज्यांतील 54 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या पोटनिवडणुकीचे निकाल बिहार निवडणुकीबरोबरच 10 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत.