बिजींग – चीनने अरूणाचल सीमेनजिक रेल्वे मार्ग बांधण्याचे काम सुरू करायचे ठरवले आहे. सिचुआन ते तिबेट या मार्गावर हा रेल्वे प्रकल्प असणार आहे.
तिबेटच्या लिंझी प्रांताला लागून हा प्रकल्प असून तो भारताच्या अरूणाचल सीमेनजिक आहे. त्यामुळे चीनच्या कोणत्याही भागातून थेट अरूणाचलच्या सीमेवर रेल्वेने सामग्री पोचवण्याचे काम चीनला सोपे होणार आहे.
या मार्गावर जे दोन मोठे बोगदे आणि एक पुल बांधायचा आहे,त्यासाठीच्या निवीदा प्रक्रिया चीनने पुर्ण करीत आणल्या आहेत. हा चीनचा तिबेट मधला दुसरा मोठा रेल्वे प्रकल्प आहे. या आधी चीनने किंगहाई-तिबेट हा प्रकल्प सुरू केला आहे.
चीनने अरूणाचल प्रदेश नजिक लिझीं प्रांतात एक विमानतळही उभारला आहे. चीनने अरूणाचल प्रदेशवरही गेल्या अनेक दिवसांपासून दावा सांगितला आहे. त्यामुळे त्यांच्या या हालचाली भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.