भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने चतुर्थ श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 62 वरून 60 इतके खाली आणण्याचा निर्णय शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने घेतला असल्याचा दावा कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विटरवर केला आहे.
या संबंधात सरकारने खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तथापि ही एक अफवा असल्याचा खुलासा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. असले घाणेरडे काम त्यांचेच सरकार करू शकते असा टोमणाही शिवराजसिंह चौहान यांनी मारला आहे.
दरम्यान मध्यप्रदेश सरकारने ही ऑर्डर केवळ मंत्र्यांकडे सेवेला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधातच काढली आहे असे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने कळवले आहे.
अन्य सरकारी सेवेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील असेहीं कमलनाथ यांनी म्हटले आहे.