मुंबई – पती टकला असल्यामुळे एका 27 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट पत्नीने पतीविरूद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पती टक्कल पडलेला आहे. तो विग घालतो ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. माझी फसवणुक केली, अशी तक्रार नवविवाहितेने मुंबई पोलीसात केली आहे.
वृत्तानुसार, 29 वर्षीय आरोपी पती टकला आहे. त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीपासून लपवून ठेवली होती. जेव्हा पत्नीला ही बाब लक्षात आली तेंव्हा तिने पतीविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीने ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
नवविवाहितेने तक्रारीत म्हटले आहे की, पतीने लग्नानंतर देखील तो टकला असल्याचे सांगितले नाही. होणारा पती टकला आहे हे जर अगोदर माहिती असते तर मी लग्न केले नसते, असे तिने म्हटले आहे.
पती टकला असल्याबाबत जेंव्हा नविवाहितेने सासरच्यांना सांगितले तेंव्हा, ही काही मोठी गोष्ट नाही असे सासरच्या मंडळींनी सांगितले. यामुळे हैराण होऊन नवविवाहितेने पतीविरूद्ध फसवणूक व मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.