पुणे – बुधवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. त्यामुळे पुण्याकडे विमाने वळविण्यात आली.
शहराच्या विविध विभागात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. तर रात्री पावसाचा जोर वाढला. हवाई मार्गात देखील अडथळे आल्याने पुण्याकडे येणाऱ्या हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी, हवाई वाहतुकीच्या नियोजनात बदल झाला.
बुधवारी रात्री पुण्याकडे बेंगळुरूहून येणारे एअर एशियाचे विमान पुन्हा बेंगळुरूकडे वळविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. याशिवाय गो- एअर कंपनीचे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लोहगावकडे येणारे विमान हैदराबाद विमानतळाकडे वळविण्यात आले, त्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा हे विमान पुण्याकडे रवाना झाले.
रात्री दीडच्या सुमारास या विमानाचे लोहगाव विमानतळावर “लॅनिंडग’ झाले, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.