नवी दिल्ली- दिल्लीच्या मालवीय नगरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वायरल झालाय. यामध्ये बाबा का ढाबा नावाच्या दुकानातील आजोबांचा स्टॉल आहे. आजी आजोबांनी मटर पनीर, भात डाळ असं जेवण या स्टॉलवर बनवलंय. पण कोरोना काळात कोणी इथे फिरकत नाही. यामुळे भावूक झालेले आजोबा रडताना दिसत होते. पण हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर आता बाबाचा ढाबावर एकच गर्दी पाहायला मिळाली.
बाबाचा ढाबावर मटर पनीर खाण्यासाठी दिल्लीकरांनी गर्दी केली आहे. @VasundharaTankh नावाच्या यूजरने बुधवारी संध्याकाळी आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. ट्वीटरवर आतापर्यंत २.३ मिलियनवेळा हा व्हिडीओ पाहीला गेला आहे.
This video completely broke my heart. Dilli waalon please please go eat at बाबा का ढाबा in Malviya Nagar if you get a chance 😢💔 #SupportLocal pic.twitter.com/5B6yEh3k2H
— Vasundhara Tankha Sharma (@VasundharaTankh) October 7, 2020
दरम्यान, एका रातोरात अनेकजण वायरल झाले. स्टार सुद्धा झाले. सोशल मीडियावर सध्या अनेकांना चांगल्या संधी प्रात्प झाली. अनेकांना मदतीचा हातही मिळाला. त्यामुळे सोशल मीडियाने अनेकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडले आहे.