मुंबई – संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले आहे.
मात्र अशा कठिण परिस्थीतीत देखील टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस) या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
1 ऑक्टोंबरपासून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन लागू करण्यात येणार आहे.
टीसीएस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत तब्बल 3 लाख कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं आहे. तसेच आयटी सर्व्हिसेसचा आर्टिजन रेट 8.9 टक्के राहिला असून आतापर्यंत तो सर्वात कमी आहे.
टीसीएस कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबरोबरच नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचाही निर्णय घेतला आहे.
टीसीएसमध्ये सध्या 4 लाख 53 हजार 540 कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे एचआर ग्लोबल हेड मिलिंद कक्कड यांनी दिली आहे.