मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.
दरम्यान,एम्स रुग्णालयाच्या अहवालाबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपलं व्यक्त केलं होत. तर आता वृत्तवाहिनीशी बोलताना परमबीर सिंग म्हणाले, ‘ या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले होते. तसेच मुंबई पोलिसांच्या चौकशीला बदनाम करण्यासाठी ८० हजारहून अधिक बनावट खाती तयार केली होती.
सोमवारी मुंबई पोलिस आयुक्तांनीही पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलीस नेटाने काम करत असल्याचं सांगितलं होतं. मात्र १४ जूननंतर सुशांत मृत्यू तपास करणाऱ्या मुंबई पोलिस आणि राज्य सरकार यांना 80 हजार अकाऊंट्स भारतातून न उघडता परदेशातून उघडण्यावर भर दिला गेला.
यामध्ये तुर्की, इंडोनेशिया, जपान, थायलंड आदी देशांचा समावेश होतो. सायबर सेल आता या अकाऊंट्सचाही तपास करत आहे.केवळ राज्य सरकारची बदनामी करणे, मुंबई पोलिसांबद्दल अपप्रचार करणे हे दोन उद्देश समोर ठेवूनच ही अकाउंट्स काम करत असल्याचं यात म्हटलं आहे.
यातून जे हॅशटॅग ट्रेण्ड झाले ते केवळ सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असेच होते असं कळतं आहे. आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत असल्याचं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
ही पत्रकार परिषद होतानाच सायबर सेलने आपला असा 80 हजार बनावट अकाऊंट्सचा अहवाल देणं याने आता नवी कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तत्पूर्वी, परमबीर सिंग यांनी फॉरेन्सिक समिती समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिल्यानंतर ‘आम्ही खरे आहोत’ असं म्हणत आपली भूमिका मांडली होती.