Rhea Chakraborty – 2020 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (sushant singh rajput) त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) डेट करत होता. त्यामुळे रियावर सुशांतला आत्महत्येसाठी (sushant singh rajput death) प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे रियाच्या आयुष्यात मोठा बदल झाला.
या प्रकरणात, अभिनेत्रीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती आणि दरम्यान ती 28 दिवस तुरुंगात (experience on jail) होती. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान रियाने काही मोठे खुलासे केल्याचं दिसून आलं आहे. रिया चक्रवर्ती हिने थेट सांगितले की, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर दिग्दर्शक तिला चित्रपटामध्ये घेण्यासही घाबरत होते.
सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्यात आलेल्या वादळाबद्दल बोलताना रिया म्हणाली, “पहिल्या काही महिन्यांत मला वादळात फेकल्यासारखं वाटत होतं. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर दु:ख ही अशी गोष्ट आहे जी दीर्घकाळ टिकते. ते जात नाही. 2020 हे वर्षे माझ्यासाठी पार कठीण राहिले. मला चित्रपटांमध्ये कोणीही काम देत नव्हते.
दिग्दर्शक मला काम देण्यास घाबरत होते. लोक मला चित्रपट आॅफर करण्यासही घाबरत होते. मी आता फक्त हेच विचार करते की, सर्वकाही ठीक होईल. हे नक्कीच आहे की, अगोदरपेक्षा आता काही गोष्टींमध्ये सुधारणा ही नक्कीच आहे. नेटकरी आता मला टार्गेट करत नाहीत. हळूहळू सर्वकाही व्यवस्थित होताना दिसत आहे. असं अभिनेत्री यावेळी म्हणाली.
रिया चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर सांगितला तुरुंगातील अनुभवाबद्दल…
अभिनेत्रीने सांगितले की त्या काळात तिला अनेक महिलांनी वेढले होते, ज्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही स्वतःसाठी आनंद शोधतात. तुरुंगाबद्दल बोलत असताना, रियाने प्रेमळ वातावरणाबद्दल बोलले आहे, आनंदाचे क्षण कॅप्चर करण्याच्या आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करण्याच्या तिच्या क्षमतेवर जोर दिला आहे.
View this post on Instagram
तुरुंगातील तिच्या आव्हानात्मक दिवसांबद्दल बोलताना, रियाने कबूल केले की तिला तुरुंगात ज्या महिलांना सामोरे जावे लागले, त्यांच्यामध्ये रविवारी समोसे खाण्यापासून ते एखाद्यासाठी नृत्य सादर करण्यापर्यंत अनपेक्षित ठिकाणी आनंद मिळवण्याची क्षमता होती.
रियानेही कबूल केले की, त्या काळात तिचे आयुष्य अशांत होते. ती म्हणाली की माझे जीवन नरकापेक्षा वाईट होते, परंतु माझे मन आग्रहाने सांगत होते की जर एखाद्याला स्वर्ग किंवा नरक यापैकी एकाची निवड करायची असेल, तर ती व्यक्तीच्या दृष्टीकोन आणि मानसिक वृत्तीची बाब आहे’. असं रिया या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.