Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज 38 वी जयंती आहे. त्याच्या निधनाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजही चाहते त्याच्या आठवणीत भावूक होतात. नुकतेच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय सुशांतच्या जयंतीनिमित्त बहीण श्वेता सिंह देखील भावूक झाली आहे.
रिया चक्रवर्तीने इंस्टा स्टोरीवर खास फोटो शेअर केला आहे. तिने सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेता खूपच आनंदी दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने हार्ट इमोजी देखील दिले आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीने देखील सुशांतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
तर सुशांतची बहीण श्वेता सिंहने भावाचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “माझ्या सोन्यासारख्या भावाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. तुझ्यावरचं माझं प्रेम अनंत राहो. तुझा लाखोंचा चाहतावर्ग आहे. त्यांना प्रेरणा देण्याचं काम तू कायमच करत आला आहेस. तू कायम चमकत राहा आणि दिशा दाखवण्याचं काम करत राहा”.
त्याच्या अचानक एक्झिटने अवघी चित्रपटसृष्टी हळहळली होती. एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नेहमीच सुशांत सिंह चाहत्यांच्या स्मरणात आहेदरम्यान,सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकमेकांना डेट करत होते. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुशांत मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचे काय पो छे, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, छिछोरे, केदारनाथ, दिल बेचारा हे चित्रपट सुपरहिट ठरले होते.