“डियर जिंदगी’मधून आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांची जोडी पहिल्यांदा झळकली होती. हा चित्रपट सुपर हिट ठरला होता आणि या जोडीलाही चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती. या दोन्ही कलाकारांमधील वयात फोटो फरक असला तरी ती परफेक्ट जोडी मानली गेली. यानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहे.
आलिया ही शाहरुख खानची मोठी फॅन असून ती त्याच्यासोबत अधिकाधिक चित्रपट करू इच्छिते. परंतु सध्या शाहरुख हा चित्रपटांपासून जार लांबच आहे. सध्या तो एक स्क्रिप्ट वाचत असून अद्याप त्याने कोणत्याही चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
दुसरीकडे शाहरुखची कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंट एकापाठोपाठ एक चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यातच आता रेड चिलीज आलिया भट्टला घेवून एक चित्रपट तयार करण्याचे प्लॉनिंग करत आहे.
या चित्रपटाचे “डार्लिंग’ असे नाव असणार आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट असून यात चाहत्यांना थ्रिल अनुभवण्यास मिळणार आहे. हा एक नायिका प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया निर्णायक भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाची स्क्रिप्ट आलियाने वाचली असून तिने होकार दिल्याचे समजते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलिया सध्या संजय लीला भंसाली यांच्या एका चित्रपटात काम करत आहे.