…त्यामुळे भाजप नेत्यांवरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण

हाथरस प्रकरण : भाजप नेत्याच्या 'त्या' विधानावरून रोहित पवार यांची टीका

मुंबई – हाथरस प्रकरणाने अख्खा देशचं हादरला आहे. यावरून उत्तरप्रदेश सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी ‘मुलींचे चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात’ अशी मुक्तफळे  उधळली. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुलींवर चांगले संस्कार केले तर बलात्कार होणार नाहीत’, असे बेताल वक्तव्य युपीतील भाजपच्या एका आमदार महाशयांनी केले. एकीकडे आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळे त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर मुलींचे  चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले होते.

तसेच, मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.