पिंपरी – पिंपरी येथे नव्याने सुरू झालेल्या फुलबाजारात गेल्या अनेक दिवसांपासून चिखल आणि घाण साचली होती. त्यामुळे येथील फुल व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने येथील सर्व चिखल आणि साचलेली घाण साफ करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने फूलबाजारात चिखल आणि घाण साचली होती. अशातच येथील फुल व्यापाऱ्यांना आपला व्यापार करावा लागत होता. बाजार समितीचे राजू शिंदे यांनी ही बाब पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. येथे साफसफाई व्हावी म्हणून पाठपुरावा सुरू केला. अखेर पालिकेच्या सफाई कामगारांनी सर्व चिखल आणि घाण साफ करून फूलबाजार स्वच्छ केला. ही स्वच्छता करण्यासाठी पालिकेचे मुकादम संभाजी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी शेतकरी व फूल आडत व्यापारी यांना बाजारात येणाऱ्या अडअडचणी तात्काळ सोडविण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी येथील अडीअडचणी सोडविण्यात येत आहेत. तसेच व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात येतील.
– राजू शिंदे, कृषी बाजार समिती पुणे, उपबाजार पिंपरी