मुंबई – चित्रपट महोत्सव म्हंटले की व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणून या चित्रपट महोत्सवाला औरखले जाते.
१९३२ साला पासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे. . याबाबत ची सविस्त माहिती चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती.
दरम्यान, या चित्रपटानं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. चैतन्य ताम्हाणे याच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला ७७ व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सवात FIPRESCI च्या ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपट महोत्सवाची सांगता होण्यापूर्वीच ही आनंदाची बातमी समोर आली आहे.
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती .