शिक्रापूर -वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका युवकाचे त्याच्या मित्रांनी उसण्या पैशाच्या वादातून अपहरण करत युवकावर खुनी हल्ला केला होता. या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीस शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश सुभाष जाधव (वय 33, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे.
निलेश बबन भंडारे (रा. वढू बुद्रुक) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी गणेश जाधव व दत्ता फुलारे दोघे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते.पैकी गणेश जाधवला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे.