मुंबई – अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवालविद्यार्थ्यांची परीक्षा संदर्भातील भावना आणि शासनाची भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसंदर्भातही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.
— Uday Samant (@samant_uday) September 2, 2020
दरम्यान, ‘विद्यापीठ, महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा,’ अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जावे लागणार नाही. या मुद्द्यांवर राज्यपालही सकारात्मक असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.