लंडन – इंग्लंडमधील एका स्थानिक क्रिकेट लीगमधील सामन्यात नवोदित क्रिकेटपटू ख्रिस हॉलिडे याने 113 चेंडूंत 316 धावांची वादळी खेळी केली. खरेतर यासाठी त्याचे कौतुक व्हायला हवे होते. मात्र, त्याने विक्रमासाठी खेळण्यापेक्षा अन्य फलंदाजांना संधी देण्यासाठी निवृत्त व्हायला हवे होते, अशा शब्दांत त्याच्यावर सोशल मीडियावर टीका झाली.
सामना स्थानिक असला तरीही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ख्रिसने आपल्या खेळीत तब्बल 34 षटकार आणि 21 चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर हॉलेंडस्वाइन संघाने 30 षटकांच्या या सामन्यात डेन्बी संघावर 378 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
ख्रिसने वादळी खेळी केल्यावर निवृत्त व्हायला हवे होते अशी टीका त्याच्यावर झाल्यानंतर त्यानेही आपली बाजू मांडली. मला कर्णधार व प्रशिक्षकांनी खेळी सुरू ठेवण्याची सूचना केल्यामुळे निवृत्त होता आले नसल्याचे मत त्याने व्यक्त केले.