मथुरा – उत्तर प्रदेश राज्यात मथुरेतील जिल्हा तुरुंगात 24 कैद्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर तुरुंगातील 500 कैद्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक शैलेंद्र मैत्रेय म्हणाले की, “आम्ही तुरुंगाची व्यवस्थित देखभाल करत आहोत. मात्र, कर्मचाऱ्यांशिवाय बाहेरून येणाऱ्यांमुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे तुरुंगात बाहेरून येणाऱ्यांमुळेच संसर्ग पसरला असल्याची शक्यता आहे.’
तुरंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. 554 कैद्यांसाठी असलेल्या या तुरंगात 96 महिलांसहित दीड हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. लक्षणे दिसत नसलेल्या करोनाबाधित कैद्यांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे करोनाबाधितांमध्ये डेप्युटी जेलरचाही समोवश आहे. त्यामुळे संपूर्ण तुरंग जिल्हा प्रशासनाकडून निर्जुंतुकीकरण केला आहे.