मुंबई – विद्या आणि कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच आज पासून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र कोरोना विषाणूमुळे काहीसं पालटलेलं आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीही गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.
दरम्यान, अश्यातच अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर एक नवीन वाद पेटला आहे. प्रविण तरडे यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरच्या गणपतीसाठी तरडे यांनी पुस्तकांचे डेकोरेशन केले आहे.
गणरायाच्या मूर्तीच्या चारही बाजूने पुस्तकं सजवली आहेत. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आहे आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रवीण तरडे यांना चांगलंच ट्रोल केले आहे. देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा तुम्ही का केला? असा सवाल प्रवीण तरडेंना विचारण्यात आला.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1027450897692458&id=131810380589852
दरम्यान, सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यामुळे अखेर प्रविण तरडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून गणपतीचा तो फोटो डिलीट केला टाकला आहे.
प्रवीण तरडे भारतीय संविधान हे फक्त पुस्तक नाहीये अन तू हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला आहे.
प्रत्येक वेळेस तुझी नीच मानसिकता का दाखवतो. pic.twitter.com/Ie3q4tWjdd— Pratik Patil (@Liberal_India1) August 22, 2020