आपल्या डान्स व्हिडिओ आणि सतत बदलत्या फॅशन ट्रेन्डसमुळे प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेहीने सोशल
मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये “एक नवीन शिवी’ शोधून काढल्याचे तिने सांगितले आहे. आता या पुढे कोणालाही शिवी द्यायची झाली, तर याच शिवीचा उपयोग ती करणार असल्याचेही नोराने म्हटले आहे.
तिचा व्हिडिओ बघणाऱ्यांना ही शिवी खास पसंत पडली असावी. कारण तिच्या व्हिडिओला 10 हजारपेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. तिने शोधून काढलेली शिवी म्हणजे दुसरे- तिसरे काहीही नसून फक्त “2020′ आहे. “ए 2020 निकल यहांसे. एक नंबरके 2020 हो तुम’ असे नोराने म्हटले आहे.
तिच्या या शिवी हासडण्याचा अंदाज खूपच क्युट आहे. करोना विषाणूची साथ जगभर पसरल्यामुळे लॉकडाऊन लागू करायला लागला आणि सगळे व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे 2020 हे वर्षच एखाद्या शिवीसारखे वाटायला लागल्याचा मेसेज नोराने आपल्या व्हिडिओमधून दिला आहे.
“दिलबर’पासून “साकी साकी’ सारख्या आयटम गाण्यांमुळे नोरा एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली. सर्वांत अलीकडे “स्ट्रीट डान्सर’मध्ये तिचा डान्स आर्टिस्टचा रोल होता. आता लवकरच अजय देवगणबरोबर “भुज : द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये ती दिसणार आहे.
View this post on Instagram
Didn’t even notice, no punches left to roll with, U got to keep me focused, U want it? Say so ✨💫 💅🏽👑