लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी वेगवेगळे छंद जोपासले. रणवीर सिंहने या काळात आपली बॉडी बिल्डिंगची हौस भागवून घेतली. या 4-5 महिन्यांच्या काळात त्याने अत्यंत कठोर परिश्रमाने आपली शरीर संपदा विकसित केली आहे.
View this post on Instagram
I gotta take it on the other side 🎵 🎶 what’s your favourite @chilipeppers track ? 🌶
त्याने आपल्या बॉडी बिल्डिंगचे काही फोटो सोशल मिडीयावर अपलोडही केले आहेत. त्याच्या या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या फोटो सेशनवर टायगर श्रॉफनेही कॉमेंट केली आहे. त्याने या फोटोंना फायर इमोजीने लाईक केले आहे.
सध्या रणवीर सिंह पत्नी दीपिका पदुकोणबरोबर क्वालिटी टाईमपास करतो आहे. त्याबरोबर तो आपल्या वर्कआऊटवरही लक्ष केंद्रीत करतो आहे. रणवीरचा “83′ 10 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊन लागू असल्याने हा सिनेमा थिएटर रिलीज होऊ शकला नव्हता.
View this post on Instagram
Hair by: @deepikapadukone Very Mifune in ‘Yojimbo’. I like it. What do you think?
आता हळूहळू लॉकडाऊन शिथिल व्हायला लागल्याने आता “83′ रिलीज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंह भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर दीपिका कपिल यांच्या पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा इतिहास “83’मधून प्रेक्षकांच्या समोर पुन्हा एकदा साकारला जाणार आहे.