दुबई – पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडने विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर त्यांनी आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत वर्चस्व राखले.
कसोटी क्रमवारीत तिसरे स्थान त्यांनी मिळवले आहे.अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडचे बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स व स्टुअर्ट ब्रॉड या तीन खेळाडूंनी क्रमवारीत स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत भारताच्या रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन या दोनच खेळाडूंना या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स पहिल्या स्थानावर कायम आहे. वोक्सने 7 वे स्थान मिळवले आहे तर, ब्रॉड 10 व्या क्रमांकावर आहे. जाडेजा तिसऱ्या तर, अश्विन 5 व्या स्थानावर आहे.