कोल्हापूर (प्रतिनिधी) -जुन्या सातबारा उताऱ्या प्रमाणे ऑनलाईन सातबारा उताऱ्यामध्ये जमिन क्षेत्राची दुरुस्ती होवून, नवीन सातबारा उतारा मिळणेकरीता तक्रारदाराकडे तलाठ्याने ५० हजार रुपयांची मागणी होती, त्यातील २५ हजार रुपये घेताना स्वीकारताना तलाठी मारुती खपले, वय – ५४, रा. मु.पो कणेरी फाटा , ता. करवीर ,यांना जि.कोल्हापूर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या कडून जुने सातबारा उताऱ्या प्रमाणे ऑनलाईन सातबारा उतारामध्ये जमिन क्षेत्राची दुरुस्ती होवून नवीन सातबारा उतारा मिळणेकरीता संशयित आरोपी मारुती खपले, यांने तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती हा व्यवहार ४५ हजारांवर निश्चित झाला होता. लाचेच्या रकमेतील, पहिला हप्ता २५ हजार रुपये स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठ्याला रंगेहाथ पकडून, अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ बुधवंतपोलीस उपअधीक्षक, जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, शाम बुचडे, शरद पोरे, सुरज अपराध, रुपेश माने , संग्राम पाटील यांनी केली.