बारामती -शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून आज नवीन 21 संक्रमित रुग्ण आढळल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. एकूण संख्या 257 इतकी झाली आहे. शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
(दि. 8) 101 संशयित नमुन्यांमध्ये त्यामध्ये 21 संक्रमित रुग्ण आढळून आले. आजअखेर रुग्णांची संख्या 257 झाली असून (दि.8) रात्री शहरातील अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील विवेकानंदनगर येथील तीस वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील खजूर रुग्णाच्या संपर्कातील एक 29 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दहा वर्षाचा मुलगा, वसंतनगर येथील चाळीस वर्षे पुरुष व तीस वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 58 वर्षीय महिला, मुजावरवाडा येथील 47 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील पुरुष, ढेकळवाडी येथील खताळपट्टा येथील 38वर्षीय पुरुष, एमआयडीसीमधील साठ वर्षीय पुरूष, भोई गल्ली येथील 65 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 11 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय पुरुष व इंदापूर रोड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास बाधा झाली आहे.
शहरातील 68 वर्षीय महिला, गुणवडीतील 26 वर्षीय युवक, उर्जा भवन येथील वीस वर्षीय युवती, शहरातील 43 वर्षीय महिला, मोरेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष व शहरातील 36 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे.