सातारा – जिल्ह्यात काल (दि. 6) रात्री आणखी 202 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
वाई तालुक्यात परखंदी येथे एक पुरुष, पसरणीत एक महिला, वाई शहरात सहा महिला, चार युवक, एक मुलगा, कराड तालुक्यातील तासवडे येथील एक पुरुष, कराड शहरातील 11 महिला, एक बालिका, 12, 8, 5, 6 व 10 वर्षे वयाची मुले, 21 पुरुष, कोलेवाडी येथील दोन पुरुष, दोन महिला, बनवडीतील 5 वर्षांचे बालक, टेंभू येथील एक पुरुष, सैदापूर येथील एक पुरुष, चोरे येथील 8 वर्षांची बालिका, 12 महिला, 12 पुरुष, पाल येथील एक पुरुष, वडोली येथील दोन पुरुष, दोन वर्षीय महिला, धावडशीतील एक पुरुष,
कार्वे येथील एक पुरुष, गोटे येथील एक महिला, उंब्रज येथील एक महिला, ओंड येथील एक महिला, एक पुरुष, मलकापूर येथील एक महिला, एक पुरुष शिंदेवाडीतील एक पुरुष, हनुमानवाडीतील एक पुरुष, महाबळेश्वरमधील स्कूल मोहल्ल्यातील नऊ पुरुष, पाच महिला, तालुक्यातील तळदेव येथील एक पुरुष, कोरेगाव शहरातील जुन्या पेठेतील एक पुरुष, तालुक्यातील देऊर येथील एक पुरुष,
शेंदुरजणे येथील एक पुरुष, सातारा तालुक्यातील विकासनगर येथील एक पुरुष, जकातवाडीतील एक महिला, सातारा शहरातील सहा पुरुष, दोन महिला, काशीळ येथील एक महिला, एक पुरुष, पाटखळ येथील 13 वर्षांचा मुलगा, तीन महिला, सासपडे येथील दोन पुरुष, कळंबे येथील एक पुरुष, शाहपुरी (ता. सातारा) येथील 15 वर्षांची मुलगी, दोन महिला, दोन पुरुष, निगडी येथील पाच महिला, दोन पुरुष,
निगुड माळ येथील एक पुरुष, शिवथर येथील एक पुरुष, एक महिला, पाटण तालुक्यातील पापर्डे येथील एक महिला, पाटण शहरातील एक पुरुष, एक महिला, कोयनानगर येथील एक पुरुष, चाफळ येथील एक पुरुष, नाडे येथील दोन महिला, मारुल हवेलीतील एक पुरुष, जावळी तालुक्यातील कुडाळ येथील एक पुरुष, तीन महिला, खटाव तालुक्यातील मायणीतील एक महिला, माण तालुक्यातील दहिवडीतील तीन महिला, 16 वर्षांची मुलगी व एक पुरुष,
फलटण तालुक्यातील राजाळे येथील दोन महिला, 15 वर्षांची मुलगी, 13, 9 वर्षे वयाची मुले, फलटण शहरातील दोन महिला, दोन पुरुष, 9 वर्षांचा मुलगा, 12 वर्षांची मुलगी, जिंती नाका येथील एक पुरुष, खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील पाच पुरुष, 15 वर्षांचा मुलगा, तीन महिला, दहा वर्षांची मुलगी, लोणंद येथील 8, 14 वर्षांच्या मुली, तीन महिला, तीन पुरुष, बावडा येथील एक पुरुष, शिरवळ येथील दोन महिला, एक पुरुष यांचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे.
चार बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेली गडकर आळी (सातारा) येथील 50 वर्षीय महिला, वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला गंगापुरी (वाई) येथील 57 वर्षीय पुरुष आणि परखंदी, ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष, अशा तीन बाधितांचा काल (दि. 6) मृत्यू झाला, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.