नवी दिल्ली – ऑक्सफड – ऍस्टाझेन्का लसीची मानावावर चाचणी घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा आणि परवाना करारासंदर्भात नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीशी करार केला.
अमेरिकेच्या मेरीलॅंड येथे मुख्यालय असणाऱ्या अमेरिकन रोखे आणि विनिमय आयोगामध्ये नोंदवलेल्या करारानुसार, दोन्ही कंपन्यांनी हा करार 30 जुलै रोजी केला आहे. यात करोना लसीचा विकास, सह निर्मिती, त्याचे विपणन यांचा समावेश आहे.
नोव्हाव्हॅक्सने या लशीची मानावारील दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. सुमारे 50 जणांवर ही चाचणी घेण्यात आली होती.
उच्च मध्यम अथवा उच्च उत्पन्न गट जाहीर केलेल्या राष्ट्रांशिवाय भारतासह अन्य राष्ट्रांत साथीच्या काळात लस पुरवठा करण्याचा पूर्ण हक्क सीरमला मिळाला आहे. या करारानुसार सीरम लसीचे दोन कंपोनंट खरेदी करेल. हे कंपोनंट लशीत मिसळण्यात येतील त्याद्वारे त्याचा डोस दिलेल्या शर्रीरात अँटीबॉडीज तयार होतील.
या कराराची मुदत 15 वर्षाची असून त्याकाळात सीरम आपल्या परवानाप्राप्त देशांतून त्याचे उत्पादन घेऊ शकेल. या कराराची मुदत संपल्यानंतर पूर्ण पैसे देऊन आणि विशेषीकृत नसलेला परवाना मिळवू शकेल.
सीरमचा आणखी एक प्रयत्न
कोडाजेनिक्स ही कंपनीह किरोनावर लस शोधत आहे. त्यांची तयारी सुरू असून त्यांच्या अद्याप मानवावरील चाचण्या व्हायच्या आहेत. या कंपनीबरोबरही सीरम लस विकसित करण्यात सहभागी आहे.